Home महाराष्ट्र लॉकडाऊन हवं की नको? मनसेनं केला सर्वेक्षणाचा कौल जाहीर

लॉकडाऊन हवं की नको? मनसेनं केला सर्वेक्षणाचा कौल जाहीर

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत मनसेने सोशल मिडियावर सर्वेक्षण घेतलं होतं. मनसेने समाजमाध्यमांवरुन विविध मुद्द्यांवर सात दिवसात नागरिकांचा कौल जाणून घेतला.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी केलेल्या सर्व्हेचा कौल जाहीर करण्यात आला आहे. 54 हजार 177 नागरिकांनी या सर्वेक्षणात विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांवर आपली मते नोंदवली.

काय आहे सर्वेक्षणाचा कौल?

1. लॉकडाऊन पूर्णपणे संपुष्टात आणला पाहिजे का?

होय – 70.3 टक्के
नाही – 26 टक्के
माहिती नाही – 3.7 टक्के

2. लॉकडाऊनचा तुमच्या नोकरी/उद्योगधंद्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे का?

होय – 89.8 टक्के
नाही – 8.7 टक्के
माहिती नाही – 1.5 टक्के

3. लॉकडाऊनच्या काळात आपल्या बुडालेल्या नोकरी/उद्योगधंद्यासाठी राज्य सरकारकडून योग्य मदत मिळाली आहे का?

होय – 8.7 टक्के
नाही – 84.9 टक्के
माहिती नाही – 6.4 टक्के

4. राज्य सरकारने तुमच्या मुलांच्या शिक्षणाबाबत घेतलेला निर्णय योग्य आहे का?

होय – 32.7 टक्के
नाही – 52.4 टक्के
माहिती नाही – 14.9 टक्के

5. शालेय शुल्काबाबत सरकारी धोरणांची अंमलबजावणी होत आहे का?

होय – 10.3 टक्के
नाही – 74.3 टक्के
माहिती नाही – 15.4 टक्के

6. लोकल रेल्वेसेवा आणि एसटी सेवा पूर्ववत सुरु झाली पाहिजे का?

होय – 76.5 टक्के
नाही – 19.4 टक्के
माहिती नाही – 4.1 टक्के

7. लॉकडाऊनच्या काळातील वीज देयकाबद्दल आपण समाधानी आहात का?

होय – 8.3 टक्के
नाही – 90.2 टक्के
माहिती नाही – 1.5 टक्के

8. लॉकडाऊनच्या काळात तुम्हाला वैद्यकीय मदत वेळेत आणि योग्य मिळाली आहे का?

होय – 25.9 टक्के
नाही – 60.7 टक्के
माहिती नाही – 13.4 टक्के

9. या संपूर्ण काळात मुख्यमंत्र्यांनी घरातच बसून केलेल्या कामकाजाबद्दल आपण समाधानी आहात का?

होय – 28.4 टक्के
नाही – 63.6 टक्के
माहिती नाही – 8 टक्के

https://www.facebook.com/sandeepDadarMNS/posts/3198126356909599

महत्वाच्या घडामोडी-

सचिन तेंडुलकरचा ‘हा’ रेकॉर्ड फक्त विराट कोहलीच मोडू शकतो- इरफान पठाण

इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे; दोषींवर तत्काळ कारवाई- एकनाथ शिंदे

शिवसेनेच्या ‘या’ खासदाराला कोरोनाची बाधा

तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण; स्वत: ट्विट करत दिली माहिती