कंगना रणौतसोबत माझं काही व्यक्तीगत भांडण नाही, पण…-संजय राऊत

0
171

मुंबई : कंगना रणौतसोबत माझं काही व्यक्तीगत भांडण नाही. पण महाराष्ट्राचा मुंबईचा अपमान सहन केला जाणार नाही, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. मुंबईत पत्रकारांशी ते बोलत होते.

महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. त्यामुळे कोणीही काही बोलण्यापूर्वी भान ठेवून बोलणं गरजेचं आहे. कंगना रणौतसोबत माझं काही व्यक्तीगत भांडण नाही. परंतु महाराष्ट्राचा मुंबईचा अपमान सहन केला जाणार नाही. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणण्याचं कृत्य अत्यंत गंभीर आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्राबद्दल कोणी असं गंभीर वक्तव्य करत असेल तर तो केवळ एखाद्या पक्षाचा विषय राहत नाही. तो राज्यातील 11 कोटी जनतेचा विषय होत असल्याचंही ते म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

अखेर कंगणा रणाैतचा सूर बदलला; म्हणाली, जय मुंबई, जय महाराष्ट्र

मुंबई कोणाच्या बापाची आहे हे सांगण्यासाठी आम्ही आलो असतो पण…, रूपाली चाकणकरांचं कंगणावर टीकास्त्र

…तर आज ही वेळ आली नसती; सामना अग्रलेखातून फडणवीस सरकारवर निशाणा

कंगना तो एक बहाना है…; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर नाव न घेता निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here