मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. यावर सामनाच्या आग्रलेखातून शिवसेनेनं सीबीआयच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय.
न्यायालय आणि कायद्याचा आदर करण्यात महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. त्यामुळे न्याय आणि कायदा काय ते कोणी महाराष्ट्राला शिकवू नये. आणि ज्यांच्या अंगावर खाकी वर्दी आणि हातात राजकीय पक्षांचा झेंडा आहे अशांनी तर ते धाडस करूच नये, असं शिवसेनेनं सामनाच्या आग्रलेखातून म्हटलं आहे.
दरम्यान, सुशांतला प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणे व्हायला हवा. त्यांच्या कुटुंबियांच्या मनात काही शंका असतील तर त्यावर प्रकाश पडायला हवा, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
सामनाचे संपादक तोंडावर पडले- नारायण राणे
जिम सुरू करा; सुप्रिया सुळेंची मागणी
…पण नियती कोणालाही सोडत नाही; न्यायालयाच्या निकालानंतर निलेश राणेंचं ट्विट
महाराष्ट्र सरकारला आत्मचिंतनाची गरज; न्यायालयाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया