मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यावरुन भाजप खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय जनतेच्या मनातील हा निर्णय आहे. लोकांना ही केस सीबीआयकडे जावी हे अपेक्षित होतं. त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला, असं नारायण राणे म्हणाले. यामुळे सामनाचे संपादक तोंडावर पडले आहे, अशी टीका नारायण राणेंनी शिवसेना खासदार संजय राऊतांचे नाव न घेता केली.
महत्वाच्या घडामोडी-
जिम सुरू करा; सुप्रिया सुळेंची मागणी
…पण नियती कोणालाही सोडत नाही; न्यायालयाच्या निकालानंतर निलेश राणेंचं ट्विट
महाराष्ट्र सरकारला आत्मचिंतनाची गरज; न्यायालयाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा; म्हणाले…