मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाताच भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप नेते निलेश राणेंनीही यासंदंर्भात ट्विट केलं आहे.
आयुष्यभर एका कुटुंबाने वाटेल त्याची वाट लावली, बदनामी केली, शिव्या घातल्या… हजारो कुटुंब उद्ध्वस्त केली पण नियती कोणालाही सोडत नाही.. ह्याच जन्मात ह्या कुटुंबाला हिशेब द्यावा लागणार. मनाला वाट्टेल तसे हे कारटे वागले पण आता लोकांकडून फटके खायची वेळ आली, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
आयुषभर एका कुटुंबाने वाटेल त्याची वाट लावली, बदनामी केली, शिव्या घातल्या, हजारो कुटुंब उध्वस्त केली पण नियती कोणाला सोडत नाही.. ह्याच जन्मात ह्या कुटुंबाला हिशेब द्यावे लागणार. मनाला वाट्टेल तसे हे कारटे वागले पण आता लोकांकडून फटके खायची वेळ आली.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 19, 2020
दरम्यान, न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील सत्ताधारी तसेच विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
महाराष्ट्र सरकारला आत्मचिंतनाची गरज; न्यायालयाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा; म्हणाले…
…पण सुशांतच्या केसमध्ये अन्य कोणी पोलिसांचे हात बांधले होते का?; आशिष शेलारांचा सवाल
आता ठाकरे सरकारची दादागिरी संपेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल