अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा; 12 लाखांपर्यंत उत्पन्न आयकरमुक्त

0
7

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात एक मोठी घोषणा केली आहे. आता 12 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरण्याची गरज नाही.

नवीन करप्रणाली अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी 7 लाख रुपयांच्या कमाईवर कोणताही कर भरावा लागत नव्हता. स्टँडर्ड डिडक्शन फक्त 75000 रुपये ठेवण्यात आले आहे.

ही बातमी पण वाचा : शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

आता 24 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 30 टक्के कर आकारला जाणार आहे. तसेच 15-20 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20% कर लागेल. 8 ते 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10 रुपये आयकर लागेल. 2024 च्या शेवटच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्टँडर्ड कपातीची मर्यादा वाढवून नवीन कर प्रणालीमध्ये एक मोठी भेट दिली. ही मर्यादा 50 हजार रुपयांवरून 75 हजार रुपये करण्यात आली.

दरम्यान, जुन्या टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पूर्वीप्रमाणे जुन्या टॅक्स स्लॅबमध्ये 5 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

‘उद्धव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य? म्हणाले, राजकारणात उद्या…’

शांतिनिकेतनचे उपक्रम राज्यात राबवणार – शिक्षणमंत्री दादा भुसे

नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेत सांगलीचा बोलबाला; सांगलीच्याब्रेन बूस्टर अकॅडमीचा 100 टक्के निकाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here