मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. शरद पवार यांनी सहकारी बँकांच्या संरक्षणाची मागणी नरेंद्र मोदींकडे केली आहे.
सहकारी बँकाना 100 वर्षाची परंपरा लाभली आहे. सहकारी बँका या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. मात्र प्रथमदर्शनी आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून रिझर्व्ह बँकेचे सहकारी बँक क्षेत्राबाबतचे धोरण अस्पृश्यतेचे राहिले आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन भाषण करताना इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या पंतप्रधानांनी सहकारी बँकांचा उल्लेख केला, असं शरद पवार यांनी पत्राच्या सुरुवातीला म्हटलं आहे. केंद्र सरकारने मध्यमवर्गीयाचे हित जपण्यासाठी सहकारी बँका आरबीआयच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय घेतल्याचे तुम्ही म्हणालात. लघु आणि मध्यम क्षेत्रासाठी असलेल्या या केंद्र सरकारच्या उद्दिष्टाचे मी स्वागत आणि कौतुक करतो, असं शरद पवार यांनी पत्रात लिहिले आहे.
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात नरेंद्र मोदी यांना शरद पवारांनी लिहिलेले हे पाचवे पत्र आहे.
महत्वाच्या घडामोडी-
… ही दादांची स्टाईल असून ती मली भावते- अजित पवारांच्या भेटीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया
आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही, त्यांना कधी भेटलेही नाही- रिया चक्रवर्ती
भाजप नेते किरीट सोमय्या यांची कोरोनावर मात; ट्विट करत दिली माहिती
“नवनीत राणा आणि रवी राणा यांचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह”