अहमदनगर : कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर अजित पवार आणि रोहित पवार यांच्यातील ही पहिली भेट होती. या भेटीनंतर रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मतदारसंघातील आणि इतर प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटलो. त्यांनी प्रश्न बारकाईने समजून घेत त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं. कोणतंही काम घोळत न ठेवता थेट निर्णय घेण्याची दादांची स्टाईल असून ती मला भावते. त्यानुसार या प्रश्नांवरही निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अशा प्रकारे रोहित पवार यांनी ट्विट करत आपलं मत मांडलं आहे.
मतदारसंघातील व इतर प्रश्नांबाबत @AjitPawarSpeaks दादांना भेटलो.हे प्रश्न बारकाईने समजून घेत त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.कोणतंही काम घोळत न ठेवता थेट निर्णय घेण्याची दादांची स्टाईल असून ती मला भावते. त्यानुसार या प्रश्नांवरही निर्णय होईल,अशी अपेक्षा आहे. pic.twitter.com/FBfYo3JxwY
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 18, 2020
महत्वाच्या घडामोडी-
आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही, त्यांना कधी भेटलेही नाही- रिया चक्रवर्ती
भाजप नेते किरीट सोमय्या यांची कोरोनावर मात; ट्विट करत दिली माहिती
“नवनीत राणा आणि रवी राणा यांचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह”
“यंदाच्या आयपीएलचं टायटल स्पॉन्सर ड्रीम इलेव्हनकडे”