मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने निवृत्ती जाहीर केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याने निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबद्दल चर्चा रंगल्या होत्या. काहीवेळा त्याला निवृत्तीसंदर्भात प्रश्नही विचारण्यात आले होते. मात्र तेव्हा, ज्यावेळी योग्य वेळ येईल तेव्हा मी माझा निर्णय जाहीर करेन असं धोनीने म्हटलं होतं.
2019च्या वर्ल्डकपनंतर धोनी पुढचा वर्ल्डकप खेळणार का? हा प्रश्न अनेकांच्या मनात होता. 2019 च्या वर्ल्डकपदरम्यान भारतीय टीमचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर निवड समितीने धोनीला टीममध्ये स्थान दिलं नाही. त्यानंतर काही काळ धोनी क्रिकेटपासून लांब होता.
दरम्यान, मात्र आता 2020 मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
झेंडा माघे मग सल्यूट कोणाला मारतायत, समोर CBI दिसली की काय?; निलेश राणेंचा मुख्यमंत्र्याना टोला
तुमच्या प्रार्थनेमुळे मी मरता मरता वाचले; आयसीयूतून बाहेर येताच नवनीत राणांनी शेअर केला व्हिडीओ
काँग्रेस आणि भाजपकडून मला ऑफर होती; कंगणा राणावतचं प्रत्युत्तर
“शरद पवार पक्षातील ज्येष्ठ नेते, ते पार्थ पवारांना अधिकाराने बोलले”