“नारायण राणे भविष्य सांगणाऱ्या पक्षात गेले, त्यामुळे पोपटासारखं बोलणारचं ना…”

0
197

मुंबई : सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंतच ठाकरे सरकार राहिल. सरकारमध्ये समन्वय नसल्याने हे सरकार फार काळ टिकणार नाही, असं वक्तव्य भाजप नेते नारायण राणे यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीने पलटवार केला आहे.

नारायण राणे भविष्य सांगणाऱ्या पक्षात गेले आहेत. पोपटासारखं कागद काढून लोकांना भविष्य सांगणारा जो पक्ष आहे त्या पक्षात त्यांचा प्रवेश झाल्यानंतर ते देखील पोपटासारखे बोलणारचं ना… असं म्हणत नवाब मलिक यांनी नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिलं.

भविष्यवाणी करून राजकारण कधी चालत नाही. राजकारणात नंबर गेम असतो. त्यामुळे पोपटाने चिठ्ठ्या काढल्या आणि तसंच घडलं असं कधी होत नाही. भाजपमध्ये पोपटगिरी करणारे अनेक लोक आहेत. पण चिठ्ठ्यांवर सरकार चालत नाही, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं, असंही मलिक म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण, पत्नीलाही बाधा

…सरकार आता तरी जागे होईल का? देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

विश्वजीत कदम यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

अयोध्येतील राम मंदिर निर्माणावर पार्थ पवारांनी दिल्या पत्राद्वारे शुभेच्छा; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here