नवी दिल्ली : पंतप्रधानांनी कोरोना वॅक्सिन संदर्भातील शंकांचे निरसन केलंय. त्यामुळे कोरोना वॅक्सिनबाबत भारत लवकरच आत्मनिर्भर होईल असा विश्वास देशभरातून व्यक्त होतोय.
कोरोनाच्या वॅक्सिनवर देशातील वैज्ञानिक ऋषीमुनीप्रमाणे तपस्या करत आहेत. वॅक्सीनचे काम मोठ्या पातळीवर सुरु आहे. तीन वॅक्सिन वेगवेगळ्या टप्प्यावर आल्या आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं आहे.
वैज्ञानिकांची अनुमती आल्यावर हे वॅक्सिन देशभरात पोहोचवले जाईल, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. वॅक्सिन शेवटच्या टप्प्यापर्यंत कशी पोहोचेल याची सर्व व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही मोदींनी यावेळेस दिली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलीस पदकांची घोषणा; राज्यातील 58 पोलिसांना पुरस्कार
लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण
“पार्थ पवार आता अभिजित पवारांच्या भेटीला”
पार्थच्या जिव्हारी लागलं असेल, पण तो सर्वांचा सन्मान करतो; आत्याकडून पार्थचं कौतुक