टी 20 विश्वचषक स्पर्धेत धोनी खेळणार का? याप्रश्नावर सौरव गांगुली म्हणाला…

0
184

मुंबई : इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी टी20 वर्ल्डकप खेळणार का? हा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे. यावर बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला याबद्दल विचारण्यात आलं त्यावेळी तुम्ही धोनीलाच विचारा, असं सौरव गांगुली म्हणाला.

2020 मध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत धोनी खेळणार का, हा प्रश्न विचारण्यात अल्यावर हा प्रश्न ‘धोनीलाच का नाही विचारत’ असं सूचक वक्तव्य सौरव गांगुलीने केलं आहे.

2019 च्या विश्वचषक स्पर्धेत भारताचं आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आल्यानंतर धोनीने भारतीय संघातलं आपलं स्थान गमावलं होतं. धोनीचं वाढतं वय लक्षात घेता संघात तो पुनरागमन करण्याची शक्यता धूसर होत आहे.

दरम्यान,  सौरव गांगुलीने धोनी बद्दल बोलणं टाळलं. त्यामुळे 2020 मध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत धोनी खेळणार का?, हा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here