चंद्रपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्राकडून बिहारचे प्रभारी म्हणून नवी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्रात भाजपचे सत्ता स्थापनेचे स्वप्न भंग झाले आहे. त्यामुळे फडणवीसांची नियुक्ती बिहारमध्ये केली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रीय राजकारणात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे आता त्यांनी तिकडेच राहावे. आमच्या शुभेच्छा, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.
दरम्यान, यावरुन महाविकासआघाडीच्या अनेक नेत्यांकडूनही देवेंद्र फडणवीस याच्यावर टीका केली जात आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला कवडीचीही किंमत नाही”
“शरद पवारांचं बोलणं हे आजोबांचा सल्ला म्हणजे आशीर्वाद यादृष्टीने घेतलं तर मनावरचा ताण कमी होईल”
ठाकरे कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असाल तर…; शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याचा इशारा
…नाहीतर 15 ऑगस्टला धनंजय मुंडे यांच्या गाडीखाली जीव देणार