Home महाराष्ट्र “शरद पवारांचं बोलणं हे आजोबांचा सल्ला म्हणजे आशीर्वाद यादृष्टीने घेतलं तर मनावरचा...

“शरद पवारांचं बोलणं हे आजोबांचा सल्ला म्हणजे आशीर्वाद यादृष्टीने घेतलं तर मनावरचा ताण कमी होईल”

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ आणखी इममॅच्युअर आहे, त्याच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही अशा शब्दात शरद पवार यांनी पार्थ पवारांचा समाचार घेतला होता. यावर शिवसेनेनं ‘सामना’च्या आग्रलेखातून यासर्व प्रकरणावर भाष्य केलं आहे.

पार्थ पवार हे राजकारणात नवीन आहेत. त्यांना थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल. घरातच राजकीय व्यायामशाळा आहे. त्यामुळे मल्लखांब वगैरे कसरतीचे प्रयोग करून कसदार बनायची संधी आहे, शरद पवारांचं बोलणं हे आजोबांचा सल्ला म्हणजे आशीर्वाद यादृष्टीने घेतलं तर मनावरचा ताण कमी होईल, असं शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटलंय.

दरम्यान, सीबीआयचा घाव घालून महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता जखमी करायची असा डाव पडद्यामागून रचला जात आहे, हे समजून घेतलं पाहिजे. त्याकरता लहान वयाच्या पार्थ पवारांचा कोणी वापर तर करून घेत नाही ना? अशी शंका घेण्यास वाव आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

ठाकरे कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असाल तर…; शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याचा इशारा

…नाहीतर 15 ऑगस्टला धनंजय मुंडे यांच्या गाडीखाली जीव देणार

यापुढे रावसाहेब दानवे यांचा जावई असा उल्लेख करू नका, आमचा आता कोणताही संबंध नाही- हर्षवर्धन जाधव

आमच्या सरकारला काहीही धोका नाही, आमचे सगळे पूल भक्कम- संजय राऊत