औरंगाबाद : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हर्षवर्धन जाधव यांनी ‘यापुढे माझा उल्लेख रावसाहेब दानवे यांचा जावई असा कृपया करू नये. माझा आणि त्यांचा आता कोणताही संबंध उरलेला नाही’ असं म्हटलं आहे.
वैयक्तिक, कौटुंबिक गोष्टी चव्हाट्यावर आणू नये हे जरी खरे असलं तरी माझी परिस्थिती जरा वेगळी आहे. मी आणि माझी पत्नी संजना जाधव आम्ही दोघे सामाजिक, राजकीय जीवनात वावरत असल्याने काही गोष्टींचा खुलासा होणे गरजेचे आहे, असं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे. तसंच मी घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे, त्यामुळे माझा उल्लेख यापुढे रावसाहेब दानवे यांचा जावई असा कृपया करू नये, असंही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मी डिप्रेशनमधून बाहेर येऊन नव्या जोमाने सामाजिक कामाला लागलोय. गेली काही महिने माझ्यासाठी खूप कठीण गेली आहेत. मला धमक्या आल्या, पण या सगळ्यामधून मी बाहेर पडलो. मात्र अद्यापही मला त्रास देणं सुरूये. त्यामुळे मी घटस्फोटाचा निर्णय घेऊन तशी याचिका देखील न्यायालयात दाखल केलीये. यामुळेच माझा आता पत्नी आणि सासऱ्यांशी कुठालाही संबंध उरलेला नाही, असंही हर्षवर्धन जाधव यांनी या व्हिडिओ मध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
आमच्या सरकारला काहीही धोका नाही, आमचे सगळे पूल भक्कम- संजय राऊत
शरद पवारांनी घेतलेली ‘ती’ भूमिका योग्य- देवेंद्र फडणवीस
“राज्यातील मंत्र्यांची बदल्यांमधून प्रचंड कमाई, सीआयडी चौकशी करा”