पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गणेशोत्सवावर अनेक निर्बंध लावले आहेत.
गणेश विसर्जन सार्वजनिक स्थळांवर करण्यास बंदी असणार आहे. मात्र, मनसेने याला विरोध केला आहे. महापौर साहेब इंग्रज होऊ नका, असं म्हणत मनसेने पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर सडकून टीका केली आहे.
मनसेचे पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी महापौरांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे, कोरोनाचं संकट जगावर आहे तसंच देशावर आणि महाराष्ट्रावरही आहे. पण महाराष्ट्रात विशेषतः पुण्यात हा कोरोना केवळ देवदेवतांच्या मागे लागला आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, आपण पुणेकरांना गणपतीमूर्तीच्या साईज ठरवून देत गणेश मूर्ती घरातच विसर्जित करायचं बंधन घातलं. मात्र, इंग्रजांच्या काळातही अशी बंधनं घालण्यात येत नव्हती, असंही अजय शिंदे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
राज्यातील कोविड रुग्णालये कॅशलेस करा; नितेश राणेंची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
पार्थला इममॅच्युअर आहे, त्याच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही- शरद पवार
‘हा’ फोटो ट्विट करत निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
“बेळगावातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद मिटला”