बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगाव जिल्हयातील मनगुत्ती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवल्यानंतर सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. मात्र आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद मिटला आहे.
आता मनगुत्ती गावात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही तर एकाच ठिकाणी पाच महापुरुषांचे पुतळे उभारले जाणार आहेत. मनगुत्ती गाव प्रमुख शरद पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
दरम्यान, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरुन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर मनगुत्ती आणि अन्य तीन गावच्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन घेतलेल्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केलं जात आहे.
महत्वाच्या घडामोडी-
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या प्रकृतीत बिघाड, तत्काळ नागपूरच्या रूग्णालयात हलवलं
“बाळासाहेब थोरात खोटं बोलत आहेत, केंद्राने दूध भुकटी आयात केलेली नाही”
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं केंद्रिय मंत्र्याला पत्र, केली ‘ही’ महत्वाची विनंती