Home महाराष्ट्र ठाकरे सरकारनं कोकणी माणसावर कसला राग काढला?; आशिष शेलारांचा सवाल

ठाकरे सरकारनं कोकणी माणसावर कसला राग काढला?; आशिष शेलारांचा सवाल

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणसाठी विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यास राज्य सरकारने शुक्रवारी परवानगी दिली होती. नुकतीच एसटी गाड्या सोडण्याचीही मंजुरी दिल्यानंतर आता रेल्वेही कोकणसाठी धावणार होत्या. पण राज्य सरकारनं चाकरमान्यांसाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात येणाऱ्या ट्रेनच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती दिली आहे. यावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.

रेल्वेच्या विशेष गाड्या तयार असतानाही ठाकरे सरकारने आमच्या कोकणातील चाकरमान्यांसाठी का ही सुविधा उपलब्ध करुन दिली नाही? प्रचंड पाऊस, रस्त्यावरील खड्डे यामुळे चाकरमान्यांचे सरकारने यावेळी का हाल-हाल केले. ठाकरे सरकारने कोकणी माणसांवर कोणता आणि कसला हा राग काढला?,” असं सवाल करत आशिष शेलार यांनी केले ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं केंद्रिय मंत्र्याला पत्र, केली ‘ही’ महत्वाची विनंती

“अजित दादा आऊट ऑफ वे जाऊन कामे करतात, एखाद्याचं नसेल झालं, त्याने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असेल “

कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही- उद्धव ठाकरे

आम्ही जेव्हा राणेंच्या पाठीशी होतो त्यावेळी त्यांचे पोट्टे बनियनवर होते, त्यांनी मला शिकवू नये; गुलाबरावांचा पलटवार