Home महाराष्ट्र राज्यातील ठाकरे सरकार सर्वच मुद्दय़ावर अपयशी ठरलं आहे- नारायण राणे

राज्यातील ठाकरे सरकार सर्वच मुद्दय़ावर अपयशी ठरलं आहे- नारायण राणे

मालवण : राज्यातील ठाकरे सरकार सर्वच मुद्दय़ावर अपयशी ठरले आहेत. सत्तेतील  महाविकास आघाडीत कोणताही ताळमेळ नसल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे ऑगस्ट -सप्टेंबर पर्यंत हे सरकार कोसळेल, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हे सरकार सत्तेवर असणार नाही. असं वक्तव्य भाजप खासदार नारायण राणे यांनी केलं आहे.

अभिनेता सुशांत सिंगच्या हत्येचा मुद्दा मागे पडावा. यासाठीच कर्नाटकात जाऊन आंदोलन करण्याची भाषा शिवसेना करीत आहे. मात्र अशा आंदोलनासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोणी आव्हान देण्याची गरज नाही. आम्ही सक्षम आहोत. हिंमत असेल तर खासदार संजय राऊत यांनी आमच्या सोबत यावे. असं आव्हान त्यांनी यावेळी दिले.

दरम्यान, मालवण येथील निलरत्न या बंगल्यावर आज झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे हे बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी-

“अजित दादा आऊट ऑफ वे जाऊन कामे करतात, एखाद्याचं नसेल झालं, त्याने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असेल “

कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही- उद्धव ठाकरे

आम्ही जेव्हा राणेंच्या पाठीशी होतो त्यावेळी त्यांचे पोट्टे बनियनवर होते, त्यांनी मला शिकवू नये; गुलाबरावांचा पलटवार

..तर सरकारला शॉक देऊ, वाढीव वीज बिलांवरुन राजू शेट्टींचा राज्य सरकारला इशारा