पुणे हादरलं! 13 वर्षीय मुलीचं अपहरण करून सामुहिक बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या 8 जणांना बेड्या

0
333

पुणे : पुण्यात एक संतापजनक घटना घडली आहे. पुण्यात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी 8 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पुणे रेल्वे स्थानक परिसरातून एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन रेल्वेतील 2 कर्मचारी आणि काही रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी आठही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

दरम्यान, संबंधित घटना ही 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत घडल्याची माहिती पीडितेने दिली आहे. पीडितेने याबाबत पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई करत त्यांनी आठही आरोपींना बेड्या ठोकल्या.

महत्वाच्या घडामोडी –

जावेद अख्तर यांना अटक करण्यापासून कोणी रोखलं आहे?; राम कदम यांचा सवाल

मोठी बातमी! करूणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; बीड जिल्हा कारागृहात होणार रवानगी

बेळगावमध्ये भाजपने रचला इतिहास; महापालिकेवर भाजपचा झेंडा

करुणा शर्मा गाडीत पिस्तुल ठेवल्याचा व्हिडिओ! देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here