मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहून विदर्भातील मार्की मांगली – २ या कोळसा ब्लॉकचा लिलाव थांबविण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
हा लिलाव झाल्यास संपूर्ण वनक्षेत्रातील इकोसिस्टम आणि त्याच्यावर अवलंबून असलेले वन्यजीव यांचे खूप नुकसान होऊ शकतं. या प्रकल्पामुळे प्रदेशातील वाघ केवळ त्यांचा नैसर्गिक अधिवास गमावणार नाहीत तर खाणकाम आणि माणसांच्या वाढत्या अस्तित्वामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे. त्यामुळे या कोळसा खाणीचा लिलाव थांबविण्यात यावा, असं आदित्य ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं आहे.
माननीय कोळसा व खाण मंत्री @JoshiPralhad जी यांना पत्र लिहून मार्की मांगली-२ या कोळसा खाणीचा लिलाव थांबविण्याची विनंती केली.
I requested Hon’ble Minister of Coal, Mines Pralhad Joshi ji to halt Marki Mangli II Coal Block Auction as the site is near a crucial wildlife corridor. pic.twitter.com/XDU82xlcRb
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 10, 2020
महत्वाच्या घडामोडी-
कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही- उद्धव ठाकरे
..तर सरकारला शॉक देऊ, वाढीव वीज बिलांवरुन राजू शेट्टींचा राज्य सरकारला इशारा