“राष्ट्रवादीच्या ताकदीत वाढ; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”

0
475

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

अमरावती : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं जोरदार कंबर कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडलेले आमदार देवेंद्र भुयार यांनी आता राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडलेले देवेंद्र भुयार हे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अशा चर्चांनी जोर धरला होता. मात्र त्यांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त सापडत नव्हता. मात्र आज अखेर यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं.

हे ही वाचा : “उद्धव ठाकरेंचा मोठा डाव; एकनाथ शिंदेंच्या कट्टर विरोधकासह अनेक नेत्यांनी केली शिवसेनेत घरवापसी”

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर, आज वरूड येथे राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे, निलेश लंके यांच्या उपस्थितीत हा मेळावा होत आहे. याच मेळाव्याच्या निमित्ताने भुयार यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादीत प्रवेश केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राज ठाकरेंचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

“राणेंची मोठी खेळी; कोकणातील पदाधिकाऱ्यांसह, अनेक शिवसैनिकांनी केला भाजपमध्ये प्रवेश”

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; राज ठाकरेंची राज्य सरकारला विनंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here