Home मनोरंजन संजय दत्तचा कोविड -19 अहवाल निगेटिव्ह; मानले डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्‍यांचे आभार

संजय दत्तचा कोविड -19 अहवाल निगेटिव्ह; मानले डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्‍यांचे आभार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला अस्वस्थता आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. संजय दत्तला कोरोना सदृश्य लक्षणं जाणवल्यानं तातडीनं रॅपिड अॅण्टीजेन चाचणी करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. यानंतर संजय दत्त याने ट्टिट करत कोविड -19 अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगत डॉक्टर, परिचारिका व कर्मचार्‍यांचे आभार मानले आहेत.

मी सध्या वैद्यकीय निरीक्षणाखाली आहे आणि माझा कोविड -19 अहवाल निगेटिव्ह आला आहे. लीलावती रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचार्‍यांच्या मदतीने व काळजी घेऊन मी एक-दोन दिवसांत घरी असेन. आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या सोबत आहेत, धन्यवाद, असं संजय दत्त याने सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“युजवेंद्र चहल लवकरच अडकणार लग्नबंधनात, घरच्या घरी साखरपुडा सोहळा संपन्न”

संजय राऊतांच्या टीकेला भाजप नेते आशिष शेलारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

देश जेव्हा जेव्हा भावूक झाला, त्यावेळी…; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

नारायण राणेंना कामधंदा उरला नाही, घरी एक बोलतात, बाहेर वेगळंच; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचे राणेंना प्रत्युत्तर