मुंबई : बेळगाव जिल्हयातील मनगुत्ती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवल्यानंतर सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र सरकारने राजकारण न करता विरोधीपक्ष नेत्यांना विश्वासात घ्यावं. वेळ पडली तर त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे बेळगावात जाऊन आंदोलन करायला तयार आहोत. ते यायला तयार आहेत का विचारा, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली होती त्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना उत्तर दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कर्नाटकातील मनगुत्ती येथे रातोरात हटवल्याच्या घटनेचा आम्ही जाहीर निषेधच करतो! छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सन्मानाने बसविलाच पाहिजे! पुतळा हटविण्यास जबाबदार असणाऱ्या काँग्रेसच्या स्थानिक आमदारांच्या विरोधात शिवसेना आंदोलन करणार का? असा सवाल आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना केला आहे.
दरम्यान, अशा प्रकारे आशिष शेलार यांनी ट्विट करत संजय राऊतांना सवाल केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कर्नाटकातील मनगुत्ती येथे रातोरात हटवल्याच्या घटनेचा आम्ही जाहीर निषेधच करतो! छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सन्मानाने बसविलाच पाहिजे!
पुतळा हटविण्यास जबाबदार असणाऱ्या काँग्रेसच्या स्थानिक आमदारांच्या विरोधात शिवसेना आंदोलन करणार का? pic.twitter.com/aaXjePCGKV— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 9, 2020
महत्वाच्या घडामोडी-
देश जेव्हा जेव्हा भावूक झाला, त्यावेळी…; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा
वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, ते यायला तयार आहेत का? संजय राऊतांचा सवाल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख होतोय पाहून शरद पवार संतापले अन्…