Home महाराष्ट्र वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, ते यायला तयार आहेत का?...

वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, ते यायला तयार आहेत का? संजय राऊतांचा सवाल

मुंबई : बेळगाव जिल्हयातील मनगुत्ती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवल्यानंतर सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र सरकारने राजकारण न करता विरोधीपक्ष नेत्यांना विश्वासात घ्यावं. वेळ पडली तर त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे बेळगावात जाऊन आंदोलन करायला तयार आहोत. ते यायला तयार आहेत का विचारा, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगावातून रात्रीच्या अंधारात पोलिसांनी ज्या पद्धतीने हटवला, त्याचा धिक्कार करावा तेवढा कमी. त्याविषयी विरोधीपक्ष बोलायला तयार नाही. राम मंदिर भूमिपूजनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. त्यांचंच सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये रात्रीच्या वेळी, दिवे बंद करुन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला जातो, हे कसलं लक्षण? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

महत्वाच्या घडामोडी-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख होतोय पाहून शरद पवार संतापले अन्…

“केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह”

शरद पवारांच्या उपस्थितीत कराडमध्ये बैठक, उदयनराजेंनी उपस्थिती टाळली

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत बेस्ट 5 मध्ये”