मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात काही वृत्तवाहिन्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टार्गेट करायला सुरूवात केली आहे. एका वृत्तवाहिनीने उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख देखील केला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना फोन करून त्यांच्याजवळ वृत्तवाहिन्यांच्या भूमिकेसंदर्भात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्र्यांचा सरळ एकेरी भाषेत उल्लेख करतात, बदनामीकारक भाषा वापरतात, धमक्या देतात. सोनिया गांधींच्या बाबतीत त्यांनी हेच केलं व आता उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून आव्हानाची भाषा करतानाही त्यांना लोकांनी पाहिलं. हे सर्व पाहिल्यावर शरद पवार यांनी मला फोन केला.
एका वृत्तवाहिनीवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख एकेरी भाषेत होतोय. हे बरोबर नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री ही फक्त एक व्यक्ती नसते, तर संस्था असतेशेवटी त्यांनी प्रश्न केला, मग सरकार काय करते? पत्रकारितेचे हे चित्र चांगले नाही, असं शरद पवार यांनी संजय राऊत यांना फोनवरून सांगितलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह”
शरद पवारांच्या उपस्थितीत कराडमध्ये बैठक, उदयनराजेंनी उपस्थिती टाळली
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत बेस्ट 5 मध्ये”
“केंद्र सरकार आधी मुकं तर होतंच, कदाचित आता दृष्टिहीन आणि बहिरंही झालंय”