पिंपरी चिंचवड : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरीतील नेहरुनगर येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडिअमवर ऑक्सिजन, आयसीयू बेडची सुविधा असलेल्या एक हजार बेडचे जम्बो कोव्हिड रुग्णालय उभारण्यात येत आहे. या जम्बो कोव्हिड सेंटरचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार शहरात आले होते. यावेळी महाराष्ट्रीय कामगार कामासाठी पुढे येत आहेत का, याची चाचपणी अजित पवारांनी केली.
जंबो कोव्हिड केअर सेंटर उभारण्यासाठी कामगार कुठून मागवले? असा प्रश्न अजित पवारांनी अधिकाऱ्यांना विचारला. आपल्याकडे दोन टीम आहेत. राजस्थान आणि महाराष्ट्राचे आहेत, असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. महाराष्ट्राच्या कोणत्या भागातील आहेत? असे पुढे दादांनी विचारले. यावर कामगार कोकण आणि मुंबईत राहणारे परप्रांतीय आहेत, असे उत्तर त्यांना मिळाले.
दरम्यान, म्हणजे पाठीमागच्या काळात मुंबईत आल्याने मुंबईकर झालेले. त्यांना येण्यासाठी बस-रेल्वेचा काही प्रॉब्लेम नाही न? अशी विचारणाही अजित पवारांनी केली. त्यावर आता काही प्रश्न नाही. कालच कोल्हापूर आणि अहमदनगरहून बसने नर्स आल्या, अशी माहितीही काही अधिकाऱ्यांनी दिली.
महत्वाच्या घडामोडी-
परदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना धनंजय मुंडे यांचा दिलासा
चीनचा सामना करणं तर सोडूनच द्या, पण त्यांचं नाव घेण्याचं धाडसही नरेंद्र मोदींमध्ये नाही- राहुल गांधी
संयम सुटला तर काय कराल?; संयम ठेवलाय म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना भाजपचा सवाल
पुण्यामध्ये कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले ‘इतके’ रुग्ण