मुंबई : परदेश शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी त्याच शाखेतून पदवी घेण्याबाबत असलेले बंधन शिथिल करण्यात आले आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात माहिती दिली. या घोषणेने परदेश शिक्षणासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
परदेश शिष्यवृत्तीसाठी ज्या शाखेत पदव्युत्तर प्रवेश त्याच शाखेचे पदवी शिक्षण अनिवार्य हा नियम आता रद्द करण्यात आला असून नव्या नियमानुसार परदेशी विद्यापीठाने एखाद्या विद्यार्थ्याला विशिष्ट पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश दिला असेल व त्याचे पदवी शिक्षण अन्य शाखेतून पूर्ण असेल, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
तरीही त्याला परदेश शिष्यवृत्तीचा लाभ मिळवता येणार आहे. वयोमर्यादा पदव्युत्तर साठी 35 वर्षे व पीएचडी साठी 40 वर्षे अशीच राहील. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन/ई-मेलद्वारे अर्ज दाखल करावेत. 14 ऑगस्ट पर्यंत दिलेली मुदतही वाढविण्यात येईल, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
परदेश शिष्यवृत्तीसाठी ज्या शाखेत पदव्युत्तर प्रवेश त्याच शाखेचे पदवी शिक्षण अनिवार्य हा नियम आता रद्द करण्यात आला असून नव्या नियमानुसार परदेशी विद्यापीठाने एखाद्या विद्यार्थ्याला विशिष्ट पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश दिला असेल व त्याचे पदवी शिक्षण अन्य शाखेतून पूर्ण असेल (1/2)
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 7, 2020
महत्वाच्या घडामोडी-
चीनचा सामना करणं तर सोडूनच द्या, पण त्यांचं नाव घेण्याचं धाडसही नरेंद्र मोदींमध्ये नाही- राहुल गांधी
संयम सुटला तर काय कराल?; संयम ठेवलाय म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना भाजपचा सवाल
पुण्यामध्ये कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले ‘इतके’ रुग्ण
आदिवासी मुले, महिलांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा