औरंगाबादमध्ये 16 मजूरांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू

0
157

औरंगाबाद : जालन्यातील एका कंपनीत काम करणाऱ्या 16 मजूरांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून 14 जणांचा जागीच मृत्यू झाला. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे.

जालन्यातील एका स्टील कंपनीत काम करणारे हे 19 मजूर गावी जाण्यासाठी पायी औरंगाबादकडे निघाले होते. जालना ते औरंगाबाद रेल्वे रूळाहून पायी जाताना रात्री ते सर्वजण रुळावर झोपले. सर्वजण झोपेत असतानाच मालगाडी वरून गेल्यामुळे 16 जणांचा चिरडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर औरंगाबादच्या शासकीय इस्पितळात उपचार सुरू आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

करोनाच्या मृतांचं राजकारण नको, राजेश टोपे यांच विरोधकांना प्रत्युत्तर

…त्यामुळे राज्यातील तरुणांनाही रोजगार मिळेल; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

राज्याच्या इतिहासात प्रथमच असा विरोधी पक्ष आहे, जो महाराष्ट्राची बाजूच घेत नाही- संजय राऊत

फडणवीसजी, नाक घासून माफी मागा, नाहीतर…; राष्ट्रवादी काँग्रेसचा फडणवीसांवर निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here