मुंबई : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या. तसेच मुंबईतील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
कालपासून जोरदार पाऊस कोसळत असून आजही पावसाने मुंबईला झोडपले. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील असे भारतीय हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मुंबई व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 5, 2020
महत्वाच्या घडामोडी-
गेल्या 500 वर्षापासून आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो, आज ही अपेक्षा पूर्ण होत आहे- एकनाथ खडसे
राममंदिराच्या भूमीपूजनानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
राम जन्मभूमिचा संघर्ष कधीही न विसरता येणारा- मोहन भागवत
“संकटाच्या चक्रव्युहातून रामजन्मभूमी मुक्त झाली”