अयोध्या : अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडलं. त्यानंतर संबोधित करताना संकटाच्या चक्रव्युहातून रामजन्मभूमी मुक्त झाली, असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
आता रामलल्लासाठी एका भव्य मंदिराचं निर्माण होईल. तुटणं आणि पुन्हा उभं राहणं यातून रामजन्मभूमी मुक्त झाली आहे. राम मंदिरासाठी अनेक वर्षांसाठी अनेक पिढ्यांनी प्रयत्न केला. आजचा दिवस त्याच संकल्प आणि त्यागाचं प्रतीक आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
दरम्यान, या मंदिरामुळे या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात संधी निर्माण होईल. संपूर्ण जगातून लोकं या ठिकाणी दर्शनासाठी येतील. राम मंदिराची प्रक्रिया राष्ट्राला जोडण्याची प्रक्रिया आहे, असंही मोदींनी यावेळी सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी-
500 वर्षांची प्रतीक्षा संपली; योगी आदित्यनाथ व्यक्त केल्या भावना
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजन सोहळा संपूर्ण
भारत आता धर्मनिरपेक्ष राहिला नाही; राम मंदिर भूमिपूजनावरुन पाकिस्तान सरकारचं वक्तव्य
राम मंदिर पायाभरणीच्या दिवशी राऊतांनाझाली बाळासाहेबांची आठवण; पोस्ट केला खास फोटो