Home देश भारत आता धर्मनिरपेक्ष राहिला नाही; राम मंदिर भूमिपूजनावरुन पाकिस्तान सरकारचं वक्तव्य

भारत आता धर्मनिरपेक्ष राहिला नाही; राम मंदिर भूमिपूजनावरुन पाकिस्तान सरकारचं वक्तव्य

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये आज राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यावर टीका करत भारत आता धर्मनिरपेक्ष राहिला नाही, भारात आता सांप्रादायिक झालाय, असं वक्तव्य पाकिस्तानचे रेल्वेमंत्री रशीद अहमद यांनी केलं आहे.

भारताचं रूपांतर आता राम नगरात झालं आहे. देशात आता धार्मिक वातावरणाला रंग चढू लागलेला आहे त्याच्या बदल्यात धर्मनिरपेक्षता नाहीशी होत चालली आहे, मला तर वाटतं भारतात धर्मनिरपेक्षताच राहिली नाही. भारत देशात आता हिंदुत्ववादी शक्तींचं बळ मोठ्या प्रमाणात वाढलं आहे, अशी प्रतिक्रिया रशीद अहमद यांनी दिली आहे.

दरम्यान, उच्च न्यायालयाने राम मंदिर प्रकरणाचा निकाल दिला होता त्यावेळी देखील अहमद यांनी अशीच काहीशी प्रतिक्रिया दिली होती.

महत्वाच्या घडामोडी-

राम मंदिर पायाभरणीच्या दिवशी राऊतांनाझाली बाळासाहेबांची आठवण; पोस्ट केला खास फोटो

“आज अयोध्येच्या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘ही’ घोषणा करावी”

“निकाल राम मंदिराच्या बाजूने दिला ते गोगोई आणि बाबरी उद्ध्वस्त करणारी शिवसेना कुठेच नाही”

बाबरी मशीद होती, आहे आणि राहणार; अयोध्येतील सोहळ्याआधी ओवेसींचं ट्विट