मुंबई : कोरणामुळे मागील तीन महिन्यांपासून एसटीचे चाक थांबलेले आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असून, तीन महिन्यांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांचे पगार थकलेले आहेत. त्यामुळे थकलेले वेतन तात्काळ मिळावे या मागणीसाठी आज एसटी महामंडळातील निर्भया समितीच्या महिला सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना राखीसोबत मागण्यांचं निवेदन पाठवलं आहे.
निदान यंदाच्या रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांचे थकलेले वेतन द्यावे, अशी विनंती महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
दरम्यान, एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना मे महिन्यांचे अर्धे वेतन आणि जून-जुलै महिन्यांचे पुर्ण वेतन आद्यपही मिळालेले नाही. याबाबत वारंवार राज्यातील वेगवेगळ्या संघटनांनी अनेक निवेदनं देखील सरकारला दिली आहेत. परंतु, अद्याप वेतनाचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे आज एसटी महामंडळातील निर्भया समितीच्या सदस्यांनी उद्धव ठाकरेंना आणि अनिल परब यांना पोस्टाने राखी पाठवली आणि सोबत मागणीचे निवेदन देखील पाठवले आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मुंबई पोलीस तुम्ही आमची शान आहात; सुशांत प्रकरणावरुन केदार शिंदेंची प्रतिक्रिया
शरद पवार आणि उद्धव ठाकरे अर्जुनासारखे गोंधळलेले- संभाजी भिडे
मनसेच्या अविनाश जाधवांचा जामीन अर्ज फेटाळला
…तर मुंबई पोलिसांची सिक्युरिटी कव्हर सोडून द्या; शिवसेनेचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर