Home महाराष्ट्र राजेश टोपेंच्या कर्तव्यनिष्ठेपुढे मला आधी लगीन कोंढाण्याचं म्हणणाऱ्या तानाजीची आठवण येते- रोहित...

राजेश टोपेंच्या कर्तव्यनिष्ठेपुढे मला आधी लगीन कोंढाण्याचं म्हणणाऱ्या तानाजीची आठवण येते- रोहित पवार

मुंबई : महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. यानंतरही  रोजच्याप्रमाणे कोरोनाबाबतच्या आकडेवारीची राज्याला त्यांनी माहिती दिली. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राजेश टोपेंच्या कर्तव्यनिष्ठेपुढे मला आधी लगीन कोंढाण्याचं म्हणणाऱ्या तानाजीची आठवण येते, असं म्हणत राजेश टोपेंच्या कामाचं कौतुक केलं आहे.

जन्मदात्री आई हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना आईची काळजी घेण्यासोबतच राज्याच्या आरोग्याची काळजी वाहणारा आणि कोरोनाच्या संकटाशी निकराने दोन हात करणारा आरोग्यमंत्री’ अशी नोंद महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासात आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांची झाल्याशिवाय राहणार नाही, असं रोहित पवार म्हणाले.

राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई या परवा त्यांना सोडून गेल्या. काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. टोपे कुटुंबावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांना अंत्यसंस्काराला जाता आलं नाही, याचं दुःख आहेच पण हे सगळे लोक आणि संपूर्ण महाराष्ट्र मनाने टोपे कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहेत, असंही रोहित पवार यांनी म्हटलं.

https://www.facebook.com/RRPspeaks/posts/981302832333459

महत्वाच्या घडामोडी-

… तर तुला लोक रस्त्यावरती तुडवतील; निलेश राणेंची संजय राऊतांवर आक्षेपार्ह टीका

दूध उत्पादकांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही- जयंत पाटील

अमित शहांना कोरोनाची लागण, उद्धव ठाकरेंचं ट्वीट; म्हणाले…

…तर लोकं रस्त्यावर उतरून पंतप्रधानांचा राजीनामा मागतील- संजय राऊत