सांगली : कोरोनाच्या संसर्गामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने दूध विक्रीवर परिणाम झाला आहे. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून दूध उत्पादक शेतक-यांना मदत केली जात आहे. दूध उत्पादकांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. दूध संघांकडून दूध खरेदी सुरू आहेत, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. रविवारी ते सांगलीत बोलत होते.
शेतक-यांचे प्रश्न निदर्शनास आणणे तसेच त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणे ही चांगलीच बाब आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांची आंदोलनाची भूमिका योग्य आहे. कोरोना संसर्गाने उद्भवलेल्या प्रश्नांमुळे दूध दराचे संकट अधिक वाढले. केंद्र सरकारनेही याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी राज्य सरकारने मागणी केली आहे. मात्र, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्याने दूध उत्पादकांना मदत देणे सुरू केले आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गायीच्या दुधाला प्रतिलिटर 25 रुपये दर देणा-या दूध संघांची दूध खरेदी सुरू केली आहे. याशिवाय दूध पावडरीच्या निर्यातीसाठीही प्रयत्न सुरू असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
अमित शहांना कोरोनाची लागण, उद्धव ठाकरेंचं ट्वीट; म्हणाले…
…तर लोकं रस्त्यावर उतरून पंतप्रधानांचा राजीनामा मागतील- संजय राऊत
बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाचे उद्घाटन करण्याचा मान राष्ट्रवादीच्या ‘या’ मंत्र्याला
“केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण”