Home महाराष्ट्र …तर लोकं रस्त्यावर उतरून पंतप्रधानांचा राजीनामा मागतील- संजय राऊत

…तर लोकं रस्त्यावर उतरून पंतप्रधानांचा राजीनामा मागतील- संजय राऊत

मुंबई : जर लोकांच्या नोकऱ्या जाण्याच्या समस्येवर तोडगा निघाला नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागू शकतो, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

‘कोरोना व्हायरस महामारीमुळे आपल्या देशात 10 कोटी लोक रोजगार गमावणार आहेत. हा वरवरचा आकडा आहे. ‘कोरोना मंदी’मुळे किमान 40 कोटी कुटुंबांच्या उपजीविकेवर आक्रमण होईल असा माझा अंदाज आहे. चार लाख कोटींचा फटका व्यापार उद्योगास बसला आहे. त्यात लहान व्यापारी, दुकानदार मोठ्या प्रमाणात आहेत. लोकांच्या संयमालाही मर्यादा आहेत. नुसत्या आशेवर आणि आश्वासनांवर लोकांनी कुठवर दम काढायचा? गेल्या पंधरा वर्षांत लोकांची एकही अडचण दूर झाली नाही, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू हे पंतप्रधान मोदी यांचे मित्र आहेत. आर्थिक डबघाई आणि कोरोनासंदर्भातले अपयश यामुळे संतापलेल्या इस्रायली जनतेने जागोजागी रस्त्यावर उतरून निदर्शने सुरू केली आहेत. इस्रायलची जनता पंतप्रधान नेतान्याहू यांचा राजीनामा मागत आहे. ही वेळ हिंदुस्थानवरही येऊ शकते’ असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाचे उद्घाटन करण्याचा मान राष्ट्रवादीच्या ‘या’ मंत्र्याला

“केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण”

मंत्रीपदाची ऑफर होती पण…; स्वाभिमानीच्या ‘या’ आमदाराची प्रतिक्रिया; म्हणाले…

ज्या नवऱ्यात ताकद असते तो दोन काय चार बायका सांभाळू शकतो; शिवसेनेचं राम शिंदेंना प्रत्युत्तर