मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एका मंत्रिपदाची ऑफर होती. मात्र त्यावेळी संघटनेने काही भूमिका घेतली नाही. मंत्रीपद मिळालं असतं तर माझ्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला असता, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे.
मंत्रिमंडळात मंत्रिपदाची ऑफर होती. मात्र त्यावेळी राजू शेट्टी आणि संघटनेने कुठलीही भूमिका घेतली नाही. अर्थात यामुळं मी राजू शेट्टी किंवा संघटनेवर आजिबात नाराज नाही, कारण शेवटी ती संघटनेची भूमिका आहे. मी शेवटपर्यंत माझा मतदारसंघ आणि शेतकऱ्यांसाठी काम करत राहील, असंही देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आमदार तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र भुयारांना मंत्रिपद मिळत असताना राजू शेट्टी यांनी मिळू दिलं नाही, असा आरोप केला आहे. त्यावर बोलताना देवेंद्र भुयार यांनी ही प्रतिक्रिया दिली.
महत्वाच्या घडामोडी-
ज्या नवऱ्यात ताकद असते तो दोन काय चार बायका सांभाळू शकतो; शिवसेनेचं राम शिंदेंना प्रत्युत्तर
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईचे दीर्घ आजाराने निधन
राजू शेट्टी हे सरकारी आंदोलक, त्यांची लुटूपूटूची लढाई ही सरकार वाचवण्यासाठी- देवेंद्र फडणवीस
आंदोलनावरून खोत-शेट्टी भिडले, खोत म्हणतात, ‘हे काजू शेट्टी’ तर शेट्टी म्हणाले, ‘खोत भ्रमिष्ट झाले’