Home महाराष्ट्र बोलता बोलता सरकारचे 5 वर्ष कधी पूर्ण होतील हे भाजपला समजणारही नाही-...

बोलता बोलता सरकारचे 5 वर्ष कधी पूर्ण होतील हे भाजपला समजणारही नाही- रोहित पवार

अहमदनगर : महाविकास आघाडी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये आहे. या सरकारमध्ये सुसंवाद नाहीये. हे सरकार त्यांच्यातल्या अंर्तविरोधामुळे लवकरच कोसळेल, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

सरकार स्थापन झाल्यावर एक महिन्यात सरकार कोसळेल असे विरोधक सांगत होते, आता सहा महिने झाले आहेत, बोलता-बोलता पाच वर्षे कधी पूर्ण होतील, हे भाजपाला समजणारही नाही, असं ते म्हणाले.

दरम्यान, सध्या करोना नियंत्रणच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तीच आमची प्राथमिकता आहे. विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा एकदा सुरळित करायची आहे तसंच जनतेचं आरोग्य आम्हाला जपायचं आहे, असंही रोहित पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

भाजपचे 40 आमदार आमच्या संपर्कात- बच्चू कडू

भाजप भविष्यात शिवसेनेसोबत युती करणार का? नितीन गडकरी म्हणाले…

देवेंद्र फडणवीस यांना कदाचित WHO मधून मार्गदर्शनासाठी बोलवतील; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला