औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारच्या गाडीचं स्टिअरींंग हे शिवसेना व राष्ट्रवादीच्या हातात आहे. तर तिसरा पार्टनर मागे बसून सांभाळून चालवा रे आम्ही मागे बसलो आहोत, असं सांगत आहे. दोघांच्या हातात स्टिअरिंग असल्यामुळे ही गाडी झाडावर आदळणार आहे, असा टोला भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे.
गाडी एक आणि चालवणारे दोन आहेत, स्टिअरिंग दोघांच्या हातात आहे. पण राज्याच्या कारभाराचे स्टिअरिंग एकाच्या हातात असलं पाहिजे. स्टिअरिंगवरील हात निसटला तर अपघात होऊ शकतो, असं दानवे म्हणाले. त्याचबरोबर त्यांच्याकडे लायसन्स आणि इन्शुरन्सही नाही, अशी मिश्किल टिप्पणीदेखील रावसाहेब दानवेंनी यावेळी केली. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या हातातील स्टिअरिंग आमच्या हातात घ्यावं, अशी आमची इच्छा नाही. त्यांनी राज्यकारभार चांगला करावा, एकत्र राहावं आणि राज्याचं भलं करावं, अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही जसं मागच्या पाच वर्षात चांगलं काम केलं, तसं त्यांनीदेखील काम करावं, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
कोरोना रूग्णांच्या मदतीला धावणाऱ्या मनसेच्या ‘या’ नेत्याला 2 वर्षे तडीपारची शिक्षा
“कोकणातील जनतेच्या असंतोषाची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल”
हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही- राज ठाकरे
भाजपासोबत जाण्याची वेळ गेली…; चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानाला शिवसेनेचं उत्तर