मुंबई : मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांनी अत्यावश्यक असेल तरच गणेशोत्सवासाठी कोकणात यावं, असं वक्तव्य शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केलं होतं. या वक्तव्यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे.
विनायक राऊतांचे वक्तव्य अत्यंत दुटप्पीपणाचे आहे. त्यामुळे कोकणच्या जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्याची किंमत आता शिवसेनेला मोजावी लागेल, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, एका बाजूला भावना आणि दुसऱ्या बाजूला वस्तुस्थिती आहे. या कोकणच्या जनतेच्या भावनेवर शिवसेना स्वार झाली. ज्या चाकरमान्यांनी शिवसेना वाढविली, त्याच चाकरमान्यांच्या भावनेला ते आता पायदळी तुडवत आहेत, असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही- राज ठाकरे
भाजपासोबत जाण्याची वेळ गेली…; चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानाला शिवसेनेचं उत्तर
पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; अजित पवारांचा शब्द
“सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरून भाजपने राजकारण करू नये”