Home महाराष्ट्र भाजपासोबत जाण्याची वेळ गेली…; चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानाला शिवसेनेचं उत्तर

भाजपासोबत जाण्याची वेळ गेली…; चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानाला शिवसेनेचं उत्तर

मुंबई : राज्याच्या हितासाठी आपण आजही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यावर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नाही. ती वेळ आता निघून गेली. जेव्हा हात पकडलेलाच होता, तेव्हा त्या हाताला प्रेमानं थोपटण्याऐवजी त्या हाताला झिडकारण्याचा प्रयत्न झाला. त्रास देण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा ती वेळ गेलेली आहे. आता नको. आता त्याऐवजी आम्ही तीनजण एकत्र येऊन, परस्परांवर विश्वास ठेवून तीन पक्षांचं सरकार चांगलं काम करतंय आणि पुढची दिशा ठरलेली आहे. त्यामुळे त्याच दिशेनं आम्ही पुढं जाणार, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जुन्या मित्रांना त्यांचा जो काही मार्ग असेल… त्यांनी ते कबूल केलेलं आहे की, आम्ही आता एकटे लढणार. माझ्या शुभेच्छा आहेत, त्यांना. अर्थात त्यांच्या बरोबरचे काही पक्ष जवळ आलेले होते. आठवले, जानकर, सदाभाऊ खोत याचं काय होणार माहिती नाही. कारण भाजपा एकटं लढणार आहे. आम्ही तिघे एकत्र आहोत आणि एकत्र राहणार, असंही देसाई म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; अजित पवारांचा शब्द

“सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरून भाजपने राजकारण करू नये”

तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब प्रकरण; नवनीत राणांनी व्यक्त केला संताप

राज्यात सरकार स्थापनेबाबत चंद्रकांत पाटलांनी केला नवा खुलासा; म्हणाले…