Home महाराष्ट्र हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही- राज ठाकरे

हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही- राज ठाकरे

मुंबई : कोरोना संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभाराचं, कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. याविषयी विचारलेल्या प्रश्नावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही. त्याबद्दल काही बोलणार नाही, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी यावेळी केलं. तसंच हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही, असं राज ठाकरे म्हणाले. जिथे एकोपा नाही, एकमत नाही ते जास्त काळ टिकेल, असं वाटत नाही, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. एका कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान, लोकांना मानसिक विंवचनेतून बाहेर काढण्याची जबाबादारी सरकारची आहे. त्यासाठी काही गोष्टी सुरु करणं आवश्यक आहे. आज उद्योग बंद आहेत, दुकानं बंद आहेत, सगळे घरात बसून आहेत, नोकरी टिकेल की नाही याचीही खात्री नाही. अनेकांना नोकरीवरुन काढलंय. यावर सरकार काय विचार करतंय, या गोष्टी सरकारने सांगितल्या पाहिजे. त्यामुळे सगळं चालू करा असं माझं मत आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपासोबत जाण्याची वेळ गेली…; चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानाला शिवसेनेचं उत्तर

पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; अजित पवारांचा शब्द

“सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरून भाजपने राजकारण करू नये”

तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब प्रकरण; नवनीत राणांनी व्यक्त केला संताप