Home महाराष्ट्र काळजी करू नका, पुण्यावर अजित पवारांचं लक्ष आहे- उद्धव ठाकरे

काळजी करू नका, पुण्यावर अजित पवारांचं लक्ष आहे- उद्धव ठाकरे

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विधानभवन सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार, प्रशासन व आरोग्ययंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहे. आणि पुण्यातील परिस्थितीवर अजित दादा खूप बारकाईने लक्ष ठेवून काम करत आहे. काळजी करण्याचं काही कारण नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पुण्यासह राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. पण राज्य सरकार केंद्राकडे निधीची मागणी करत आहे. तसेच राज्य सरकारमार्फत जेवढी शक्य आहे तेवढी मदत आम्ही देत आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

खासगी प्रयोगशाळांनी रुग्णांना कोरोना पॉझिटिव्ह अहवाल परस्पर देऊ नये- उद्धव ठाकरे

सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

“महाराष्ट्रात खंजीर खुपसणारे म्हणून कोण ओळखले जातात? याचा आधी शोध घ्या”

सुशांतच्या केसवरून निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर आरोप; म्हणाले…