पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुण्याचा दाैरा करत येथील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कोरोना नियंत्रणासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या सूचना घेत निर्देश दिले.
खासगी प्रयोगशाळांनी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर परस्पर तपासणी अहवाल रुग्णांना देऊ नये. तो अहवाल संबंधित महापालिकांना द्यावा, अशीही सूचना त्यांनी केली. कोरोनाचा रुग्ण दर आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी, असंही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
दरम्यान, तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण बऱ्याचदा रुग्णालयात जायला टाळाटाळ करतात. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळून येते. असे होवू नये यासाठी खासगी प्रयोगशाळांनी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना परस्पर तपासणी अहवाल न देता संबंधित महापालिका यंत्रणेला द्यावा. जेणेकरुन रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होईल, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली
“महाराष्ट्रात खंजीर खुपसणारे म्हणून कोण ओळखले जातात? याचा आधी शोध घ्या”
सुशांतच्या केसवरून निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर आरोप; म्हणाले…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर; स्वतः गाडी चालवत ‘मातोश्री’हून रवाना