Home महाराष्ट्र सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 16 रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. सुशांत सिंहने टोकाचं पाऊल उचलण्यामागे नेमकं काय कारण होतं याचा मुंबई पोलीस तपास करत आहे. दरम्यान वारंवार याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देत याचिका फेटाळली आहे.

अलका प्रिया नावाच्या तरुणीने ही याचिका दाखल केली होती. याचिका फेटाळताना सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी पोलिसांना त्यांचं काम करु द्या असं सांगितलं. पोलिसांना त्यांचं काम करु द्या. व्यक्ती चांगली होती की वाईट याचा याच्याशी काही संबंध नाही. याचा कार्यक्षेत्राशीही संबंध आहे. जर तुमच्याकडे काही ठोस आहे तर मुंबई उच्च न्यायालयात जा, असं सरन्यायाधीशांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी-

“महाराष्ट्रात खंजीर खुपसणारे म्हणून कोण ओळखले जातात? याचा आधी शोध घ्या”

सुशांतच्या केसवरून निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर आरोप; म्हणाले…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर; स्वतः गाडी चालवत ‘मातोश्री’हून रवाना

नरेंद्र मोदींनी संस्कृत श्लोक ट्विट करत केलं राफेलचं स्वागत