Home देश नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्राची मंजुरी, दहावी-बारावी बोर्डाचं महत्त्व कमी; अनेक महत्त्वाचे बदल

नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्राची मंजुरी, दहावी-बारावी बोर्डाचं महत्त्व कमी; अनेक महत्त्वाचे बदल

नवी दिल्ली :  केंद्रीय मंत्रिमंडळाने नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली. देशातील शिक्षण व्यवस्थेत या धोरणा अंतर्गत अमूलाग्र बदल केले जाणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल आणि माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशाच्या या धोरणाबाबत माहिती दिली.

नव्या शैक्षणिक धोरणानुसार दहावी-बारावी बोर्डाचे महत्त्वही कमी केले जाणार असून पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मातृभाषा आणि स्थानिक भाषेत शिक्षण देण्यावर भर देण्यात येईल.

काय आहे नवीन फॉर्म्युला?

३ वर्ष ते ८ वर्ष- या ५ वर्षांमध्ये पूर्व प्राथमिकची ३ वर्ष आणि इयत्ता पहिली, दुसरीचा समावेश असेल.

८ वर्ष ते ११ वर्ष- या ३ वर्षांमध्ये तिसरी ते पाचवी हे प्राथमिक शिक्षण देण्यात येईल.

११ वर्ष ते १४ वर्ष – या वयोगटामध्ये पूर्व माध्यमिक शिक्षण म्हणजेच इयत्ता सहावी ते आठवीचा समावेश असेल.

१४ वर्ष ते १८ वर्ष- या वयोगटामध्ये माध्यमिक शिक्षण इयत्ता नववी ते बारावीचा समावेश असेल.

महत्वाच्या घडामोडी-

रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल होताच अंकिता लोखंडेचं ट्वीट; म्हणाली…

“उद्धव ठाकरे भूमिपूजनाला गेले तर राम मंदिराचं श्रेय शिवसेनेला जाईल याची भाजपला भिती”

राज्याचा निकाल 95.30 टक्के, यावर्षीही मुलींचीच बाजी तर पुन्हा कोकण अव्वल

भाजपला मुख्यमंत्रीपद मिळाले तरच राज्याचे हित,अन्यथा…; सामना’तून चंद्रकांत पाटलांना टोला