सर्वात जास्त पिणारी मंडळी भाजपमध्येच आहेत; नवाब मलिकांचं जोरदार प्रत्युत्तर

0
295

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयावरून भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘सर्वात जास्त पिणारी मंडळी भाजपमध्येच आहेत, असं म्हणत जोरदार प्रत्युत्तर नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांना दिलं.

हे ही वाचा : बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, ‘त्या’ आमदारांना रस्त्यात तुडवा, संजय राऊतांनी सांगितली जुनी आठवण

मागच्या कॅबिनेटमध्ये जो वाईन पॉलिसीचा निर्णय सरकारने घेतला होता, त्यावर आज शिक्कामोर्तब झालं आहे. जे भाजप आज सांगत आहे की, बेवड्यांचं राज्य होईल, त्याच भाजपात सर्वात जास्त नेते दारू पितात. भाजप नेत्यांचे दारूचे कारखाने आहेत. भाजपच्या नेत्यांचे वाईन शॉप्स आहेत. भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे आणि माजी मंत्र्यांचे बार आहेत. त्यामुळे वाईनला विरोध करणाऱ्या भाजप नेत्यांनी हे सर्व परवाने परत करावे, भाजपच्या कार्यकर्त्यांनी शपथ घेतली पाहिजे की दारू पिणार नाही, असा टोला नवाब मलिकांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“दु:खद बातमी! कोरोनामुळं शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं निधन”

“मनसेत इनकमिंगचा जलवा, मानखूर्द येथील शेकडो मुस्लिम तरूणांनी हाती धरला मनसेचा झेंडा”

स्वबळावर लढू, तयारीला लागा; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here