रश्मी वहिनींकडून मला अशा टीकेची अपेक्षा नाही- चंद्रकांत पाटील

0
3006

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे या कर्तृत्ववान आहेत. त्यांचं मी कौतुक केलं होतं. मला रश्मी वहिनींकडून अशा टीकेची अपेक्षा नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

आम्हालाही टीका करता येते. मात्र कुणीही मर्यादा सोडू नये. मी अग्रलेख लिहित नाही असं रश्मी वहिनी म्हणत असतील तर संपादक का झालात? हा प्रश्न आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. सामनातून करण्यात आलेल्या टीकेला पाटलांनी प्रत्युत्तर दिलं.

दरम्यान, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली. यानंतर सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. यावर चंद्रकांत पाटील प्रत्यृत्तर केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेनेनं संजय राऊत यांच्यावर अन्याय केला आहे- रामदास आठवले

फडणवीस सरकारच्या काळात घोषणा होऊनही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही- रोहित पवार

पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय- धनंजय मुंडे

भाजपला संपवण्याची तयारी आजपासून सुरू – शरद पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here