Home महाराष्ट्र रिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंच्या हातात, पण कुठे जायचं हे मागे बसलेले ठरवतात-...

रिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंच्या हातात, पण कुठे जायचं हे मागे बसलेले ठरवतात- देवेंद्र फडणवीस

मुंबई : ऑटोरिक्षाचं स्टिअरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे, पण कुठे जायचं हे मागे बसलेले ठरवतात, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठकारेंवर टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्र भाजपाच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते.

आम्हाला सरकार पाडण्यात इंटरेस्ट नाही, पण किमान सरकार चालवून तर दाखवा. तुम्ही एकमेकांच्या तंगड्या तोडायला सक्षम आहात. हे जनतेने निवडून दिलेलं सरकार नाही, हे धोक्याने आलेलं सरकार आहे. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली आहे. तुमची जर दिशा चुकत असेल तर ते समोर आणणे आमचं काम आहे, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखातीत आमचं सरकार तीन चाकी आहे. रिक्षा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट नारायण राणेंसारखा होतो; शिवसेनेचं चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र

ये दोस्ती…. हम नही तोडेंगे…; संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना खास शुभेच्छा!

कालची चंगू-मंगू मुलाखत बघितली; निलेश राणेंची उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर टीका

“सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी करण जोहरला चौकशीसाठी बोलवणार”