मुंबई : सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. शनिवारी आणि रविवारी मुलाखतीचे दोन्ही भाग प्रसिद्ध करण्यात आले. या मुलाखतीवरुन भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
कालची चंगू-मंगू मुलाखत बघितली. मुख्यमंत्री होऊन 6 महिने झाले तरी एक मुख्यमंत्री उत्तरं देतोय असं वाटलं नाही. असं म्हणत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, प्रश्न काय आणि उत्तर भलतीच. दूध उत्पादक आंदोलन, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, आर्थिक संकटावर उपाय योजना या विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना धड उत्तर देता आले नाही, असंही निलेश राणे म्हणाले.
कालची चंगू-मंगू मुलाखत बघितली. मुख्यमंत्री होऊन ६ महिने झाले तरी एक मुख्यमंत्री उत्तरं देतोय असं वाटलं नाही. प्रश्न काय आणि उत्तर भलतीच. दूध उत्पादक आंदोलन, विद्यार्थ्यांच्या परीक्षा, आर्थिक संकटावर उपाय योजना या विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना धड उत्तर देता आले नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 26, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी करण जोहरला चौकशीसाठी बोलवणार”
राष्ट्रवादीच्या ‘या’ मंत्र्याला कोरोनाची लागण
मंत्रालयात जायचा कंटाळा आला म्हणून…; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला
कोरोनाच्या बाबतीत जगाच्या तुलनेत भारतातील स्थिती चांगली- नरेंद्र मोदी